पाचोरा ( प्रतिनिधी) – पि.टी.सी .संचालित सु. भा. पाटील विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी गो से हायस्कूलला भेट दिली. या पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना रवींद्र बोरसे यांनी मार्गदर्शन केले
या शाळेतील विविध उपक्रमा बाबत माहिती दिली विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन आर पाटील, रणजीत पाटील, संजय करंदे यांनी केले. प्रत्येक वर्गानुसार इमारत , प्रशस्त वाचनालय याबाबत माहिती पी .एम. पाटील. व धनगर भाऊसाहेब यांनी दिली विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी दर आठवड्याला एकदा विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. प्रयोगशाळा येथील विविध संग्रहित वास्तु , यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यावेळी छाया सूर्यवंशी, अंजली गोहील, प्रयोगशाळा परिचर महाजन यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली, संगीत दालनात विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक सागर थोरात, रुपेश पाटील, यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे गीत गायन ऐकून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तबला व हार्मोनियम पाहून विद्यार्थ्यांना कुतुहूल दिसले संगणक वर्ग व प्रत्यक्ष संगणक हाताळणी याबद्दल अरुण कुमावत, वाघ यांनी मार्गदर्शन केले , शाळेतील बोलक्या भिंती विविध नकाशे महापुरुषांचे विचार हे विद्यार्थी कुतुहलाने पाहत होते कलादालनात विद्यार्थ्यांनी काढलेले चित्रांचे प्रदर्शन होते फुलदाणी. कार्टून डिझाईन, सकाळचा देखावा असे चित्र दाखवण्यात आले मार्गदर्शन सुबोध कांतयन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांनी केले यानंतर कलादालन येथे रंगभरण स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा झाली सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी वैशाली कुमावत, गायत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .
बक्षीस वितरण प्रसंगी शिक्षण विभागातर्फे सरोज गायकवाड , मुख्याध्यापक सुधीर पाटील,सु.भा .पाटील. चे मुख्याध्यापक अशोक परदेसी, दीपक पाटील. उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील एन .आर .पाटील, ए .बी अहिरे. सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली सुरुवातीला ईशस्तवन अंजली गोहील, श्रद्धा गायकवाड, ज्योती ठाकरे, यांनी केले त्यांना संगीत साथ सागर थोरात, रुपेश पाटील. यांनी दिली. प्रास्ताविकामध्ये उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी शाळेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला .प्रथम द्वितीय तृतीय अशी विभागून बक्षिसे खालील विद्यार्थ्यांना देण्यात आली. भावना महाले, खुशी वाघ तर रंगभरण स्पर्धेसाठी भैरवी पाटील, वैष्णवी मराठे, काव्या पाटील, गीत गायन साठी निशा पाटील, ललिता गोपाळ, अंकिता माडी, वकृत्व साठी राज तावडे, खुशी महाजन, तेजस्विनी पवार, 100 मीटर धावणे स्पर्धेत विराट संदांशिव, शेख नविब, समीर गोहील या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उज्वला साळुंखे ,वर्षा पाटील, रवींद्र महाले, संदीप वाघ, अभिजीत मालपुरे, राकेश पाटील, रूपाली निकम, मनोज पवार, इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये मनोगतामध्ये सिद्धी मेटकर, विराज संदांशिव, ललिता पाटील, खुशी महाजन यांनी शाळेविषयी भेट प्रसंगी आनंद व्यक्त केला
अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक ए .बी .अहिरे. यांनी सांगितले की , आमच्या शाळेत ज्ञानाची शिदोरी दिली जाते पाचोरा शहरातील आमच्या शाळेत डॉक्टर, इंजिनियर, वकील, तज्ञ या शाळेने दिले असून या शाळेचा मोठा इतिहास आहे .त्यामुळे या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते विद्यार्थ्यांचे कलागुण निर्माण केले जातात. सूत्रसंचालन अरुण कुमावत, रवींद्र बोरसे यांनी केले तर आभार सुबोध कांतयान यांनी मानले.