जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉक्टरांच्या असलेल्या रिक्त जागा पाहता तातडीने नियुक्त्या केल्या आहेत. काही डॉक्टर त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू देखील झाले असून यामुळे ग्रामीण रुग्णांना दिलासा मिळत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) म्हणून कार्यरत काही डॉक्टरांना ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यात रावेर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विजय कुरकुरे, डॉ. अजय सोनवणे, डॉ. एन. डी. महाजन, वरणगाव येथे डॉ. सचिन अहिरे, बोदवड येथे डॉ. अतुल पाटील, धरणगाव येथे डॉ. नितीन विसपुते, डॉ. स्वप्नील दसुरे तर पहूर येथे डॉ. यासिर खान यांची नियुक्ती केली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्या नियुक्त्यांमुळे गैरसोय नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांनी तत्काळ इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यात प्राथमिक टप्प्यात डॉ. झिशान खान, डॉ. चंदन महाजन, डॉ. निरंजन देशमुख, डॉ. परेश जैन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आधीचे ५ सीएमओ आहेत.