जळगाव (प्रतिनधी) – जळगाव शहरातील महाबळ येथील त्र्यंबक नगरात महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माया राजेंद्र सोनवणे रा. त्र्यंबक नगर, महाबळ हे आपल्या परिवारासह राहायला आहे. २० डिसेंबर सकाळी १० ते २३ डिसेंबर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दरम्यान आज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून मध्यरात्री घराचे दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे भाऊ कुंदन दगडू देसले रा. रायसोनी नगर यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.