महाड (वृत्तसंस्था)- महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारकि गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगारे उपसून जखमींना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.

महाड दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत त्यातील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे. ते म्हणाले कि, जखमी झालेले लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महाड दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करणारे ट्विट केले आहे.







