नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नेतृत्वाच्या पेचाने ग्रासलेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी सात तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्या बैठकीत आणि बाहेरही घमासान झाल्याचे चित्र समोर आले. अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपदाची सुत्रे कायम ठेवत पक्षाने पेचावर तात्पुरता तोडगा काढला. मात्र, त्या पत्रामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.

सोनिया गांधी यांना ज्या २३ कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यात कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कपिल सिब्बल म्हणाले कि, हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.







