जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल प्रमाणेच आजही ६०४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे.आज जिल्ह्यात जळगावसह चोपडा, अमळनेर व जळगाव ग्रामीणमध्ये संसर्ग पुन्हा वाढला आहे. आजच ६१७ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ११६ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-६३, अमळनेर व जळगाव ग्रामीण प्रत्येकी ६१ रूग्ण आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-११६; जळगाव ग्रामीण-६१; भुसावळ-५४; अमळनेर-६१; चोपडा-६३; पाचोरा-४३; भडगाव-१९; धरणगाव-४१; यावल-१३; एरंडोल-२३; जामनेर-३०; रावेर-२२; पारोळा-१८; चाळीसगाव-२०; मुक्ताईनगर-१४; बोदवड-२ व दुसर्या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ६०४ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-५३५४; जळगाव ग्रामीण-१३१०; भुसावळ-१३२१; अमळनेर-१८७६; चोपडा-१९०३; पाचोरा-९७०; भडगाव-११०५; धरणगाव-११३६; यावल-७९६; एरंडोल-१४०२; जामनेर-१४५४; रावेर-१२०७; पारोळा-१०४८; चाळीसगाव-१४१८; मुक्ताईनगर-७५८; बोदवड-३४३ व दुसर्या जिल्ह्यांमधील १२६ असे एकुण २३ हजार ५२७
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २३ हजार ५२७ इतकी झालेली आहे. यातील १६ हजार ५९९ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ६१७ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १५ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७५२ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६१७६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.







