जळगांव (प्रतिनिधी) – बहिणाई स्मृती, चौधरीवाडा, जुने जळगाव येथील संग्रहालयात २४-८-२०२० रोजी बहिणाईची १४०वी जयंती लॉकडाऊनचे पालन करत छोटेखानी कार्यक्रमात साजरी करण्यात आली.
बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी, बहिणाईंचे खापर पणतू देवेश चौधरी तसेच वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक अशोक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी भवरलाल अँण्ड कांताबाई जैन ट्रस्ट व जैन इरिगेशन यांचे सहकार्य मिळाले.