नागपूर (वृत्तसंस्था)- नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली.

तुकाराम मुंढे म्हणाले कि, मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींनुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मागील १४ दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नागपूर शहरात करोना बाधितांना बेड उपलब्ध व्हावे यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष समितीचे गठन केले आहे.







