• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनतेला रेमडेसिवीर द्यायला ‘या’ शिवसेना आमदाराने आपली ९० लाखांची एफडी मोडली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in महाराष्ट्र
0

हिंगोली (वृत्तसंस्था) – राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आणत आहे. अशात अनेक जण आपापल्या परीने लोकांना, सरकारला मदत करत आहेत. अशाच एका शिवसेनेच्या आमदाराने स्वत:ची FD मोडून लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहेत.शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले आहे. गेल्या १०-१२ दिवसांपासून कोरोनाचा वाढता कहर चिंता वाढवणारा आहे. अशात औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे.

सुरुवातीला ९०० रुपये दराने जवळपास ५०० इंजेक्शन्स आणून आमदार संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते. मात्र नंतर या इंजेक्शन्सचा तुटवटा निर्माण झाला आणि दर वाढले. त्यानंतर १८०० रुपयांनी काही इंजेक्शन्स वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी भोगायच म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता.

ही बाब संतोष बांगर यांच्या कानावर गेली. त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र, यातून काहीच मार्ग निघत नव्हता. यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. त्यात त्यांना ५ ते ६ लाखांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो बांगर यांना मिळणार आहे. त्यातही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही उपलब्ध करून दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, याबाबत संतोष बांगर म्हणाले की, सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना वॉर्डामध्ये फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आमदाराच्या या प्रयत्नामुळे का होईना पण लोकांना औषधे उपलब्ध करुन दिली जात आहेत आणि समाजात एक आदर्श निर्माण केला जात आहे.


 

 

Previous Post

पोलिसांच्या सतर्कतेमुळे डीपीच्या आगीवर नियंत्रण

Next Post

पंढरपुरात कोरोना वाढला त्याला नागरिकच जबाबदार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंढरपुरात कोरोना वाढला त्याला नागरिकच जबाबदार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon