जळगाव (प्रतिनिधी) – शहरात प्रथमच जळगाव क्रिटिकल केअर सोसायटीने महाक्रीटीकॉन २०२२ हि राज्यस्तरीय परिषद हॉटेल प्रेसिडेंट इथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेत विविध विषयांवर मंथन होऊन अनेक डॉक्टरांनी आपली मते मांडली.

शहरात एकच दिवशी ६ वेगवेगळे कार्यशाळा घेण्यात आले. त्यात सोनोग्राफी आणि इको इन , आयसीयू ही कार्यशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे घेण्यात आले. गर्भवती मातेची प्रकृती गंभीर झाल्यावर तत्काळ कसे उपचार करून आई व बाळ कसे सुरक्षित राहील याचे प्रयत्न शिकविले. व्हेंटिलेटर सिस्टीम याचे शिक्षण दिले. सर्पदंश, विषबाधा यावर एक कार्यशाळा झाली.
ब्लड प्रेशर आणि नवीन तंत्रज्ञान यावर एक कार्यशाळा झाली. त्याचे डायरेक्टर डॉ. शीला मित्रा या राज्यस्तरीय क्रिटिकल परिषदेच्या अध्यक्ष उपस्थित होत्या. डॉ जिगिशू दिवतिया हे राज्यस्तरीय भूलतज्ज्ञ परिषदेचे अध्यक्ष हे यावेळी उपस्थिती होते. डॉ कपिल झिरपे, डॉ शिवकुमार आयेर, डॉ राजेश पांडे, डॉ. बाळासाहेब बांडे, डॉ प्रदीप डीकोस्टा, डॉ सुनील पांड्या या मान्यवरांनी 6 कार्यशाळा एकच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या. पुणे ,मुंबई ,लुधियाना , हैद्राबाद, जम्मू काश्मीर , दिल्ली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद ,नांदेड ,नारायणगाव , बारामती येथून डॉक्टर्स उपस्थित होती. ही राज्य परिषद डॉ पराग चौधरी, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ राजेश डlबी अध्यक्ष डॉ राहुल महाजन, उपाध्यक्ष डॉ लीना पाटील, सेक्रेटरी डॉ. रवींद्र पाटील, सेक्रेटरी खजिनदार – डॉ. पल्लवी राणे, डॉ. अमित हीवरकर यांच्या टीम द्वारे पार पडली.
सिनियर फिजिशियन डॉ के.डी. पाटील , डॉ किरण मुठे, डॉ सुभाष चौधरी यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभले. परिषदेचे उद्घाटन डॉ उल्हास पाटील , डॉ. मारुती पोटे यांच्या हस्ते झाले .परिषदेला डॉ संजय उंबरकर , डॉ सुनील चौधरी, डॉ दीपक पाटील ,डॉ दिलीप पाटील ,डॉ राजेश मांवतकर, डॉ हरणखेडकर , डॉ प्रकाश सुरवाडे , डॉ विनोद किणगे, डॉ शशिकांत गाजरे, डॉ चेतन चौधरी ,डॉ अभय जोशी डॉ फराज बोहरी,डॉ कल्पेश गांधी ,डॉ सूयोग चौधरी , डॉ स्वप्नील चौधरी ,डॉ ललित पाटील ,डॉ अमित राजपूत,डॉ सोनाली महाजन, डॉ प्रियिंका पाटील , डॉ ऋतुराज , डॉ दीपाली साठे, डॉ संदीप भारुडे ,डॉ धीरज चौधरी , डॉ नेहा भंगाळे, डॉ अमित भंगाळे, डॉ सुवर्णा जोशी, डॉ गुणवंत महाजन ,डॉ मनोज पाटील यांनी कार्यशाळा समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.
पेपर प्रेझेंटेशन – २५ जणांनी केले. , पोस्टर प्रेझेंटेशन – २७ जणांनी केले. , ऑरगन डोनेशन स्कीट शो डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील इन्टरन आणि आय एस सी सी एम चे डॉक्टर्स डॉ रवी गावित (जुपितर हॉस्पिटल मुंबई )यांनी पार पडला. त्यावेळी आय एम ए अध्यक्ष – डॉ दीपक आठवले, सेक्रेटरी – डॉ जितेंद्र कोल्हे हे उपस्थित होते.
यावेळी जळगावमधील महिलेचे जिचे ब्रेन डेड म्हणून औरंगाबादमध्ये नेऊन सगळे ऑर्गन डोनेशनसाठी पाठवले त्यांचे परिवाराचे आभार मानले.







