जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथे विनाकारण तरूणाला मारहाण करून नाक फ्रॅक्चर केल्याची घटना घडली नशिराबाद पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैय्यद हर्शद अली शेख (वय-१८ ) हा . ताजनगर, डीपीजवळ, नशिराबाद येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २१ मे रोजी रात्री शहरातील परकोट मोहल्ला येथे तो उभा होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना त्याच्या गल्लीत राहणारे नाजीम रहीम शेख ( २१), रहिम शेख फरीद ( ३५), शेर अली सैय्यद अली ( २८) आणि अरबाज अली सैय्यद अली ( २४) यांनी बेदम मारहाण केली. यातील एकाने सैय्यद हर्शद अली शेख याच्या नाकावर लोखंडी वस्तू मारल्याने नाक फ्रॅक्चर केले. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. २३ मे रोजी रात्री संशयित आरोपी नाजीम शेख, रहिम शेख , शेर अली आणि अरबाज अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहेत.