जळगाव ( प्रतिनिधी ) – कामावरून घरी जातांना कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ क्रॉस करणाऱ्या तरूणीला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शिवाजी नगर जवळ घडली. लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली स्नेहल वैभव उज्जैनकर (वय-१९, रा. धनाजी काळे नगर, जळगाव ) असे मयत तरूणीचे नाव आहे.
स्नेहल उज्जैनकर आईवडीलांसह शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात वास्तव्याला होती . ती शहरातील एका कॉसमॅटीक दुकानावर नोकरीला होती . नेहमीप्रमाणे २३ मे रोजी रात्री स्नेहल कामावरून घरी पायी निघाली. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता. जळगाव तहसील कार्यालयाजवळून शिवाजी नगरात जाण्यासाठी रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली. लोहमार्ग पोलीसांनी मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहेत.