जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्या शाळांना सुट्टी असून ‘मल्हार हॉबी डुबी डू’ या मंचातर्फे मुलांना त्यांचे छंद विकसित करता यावे यासाठी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या सहकार्याने फ्री समर हॉबी फेस्टचे २८ मे ते ३ जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसातच १३० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या फेस्टमध्ये ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ओरिगामी आर्ट, बॉलिवूड स्टाईल डान्स, संगीत, सायबर सिक्युरिटी, इ.विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे ऑनलाईन शिबीर घेण्यात येणार आहेत. हे शिबीर ७ दिवसांचे असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात येतील. हॉबी फेस्ट विद्यार्थ्यांना सुप्तगुणांना ओळखून त्याचे पॅशन आणि नंतर प्रोफेशनमध्ये रूपांतर करण्यासाठी मदतगार ठरेल.
हॉबी फेस्टमध्ये नाव नोंदणीसाठी ८३१९८९०६४३, ९८३४८६०८६२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मल्हार हॉबी डुबी डू या फेसबुक ग्रुपवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक चा वापर करा – https://forms.gle/4waToi4mKrjVerZb9