पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ. विविध कार्यकारी सोसायटीच्या १२ जागांसाठी २२ मेरोजी निवडणुक झाली . या लढतीत १२ पैकी १२ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत पिंप्री प्र.ऊ. विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.
या निवडणुकीत रामकृष्ण पाटील, राजेंद्र पाटील, अरूण पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील, भास्कर पाटील, काळु पाटील, विश्राम पाटील, लिलाबाई पाटील , मंगलबाई पाटील, शंकर पाटील व अर्जुन विसावे यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती दिनकर पाटील, राजेंद्र पाटील, रामलाल पाटील, दयाराम पाटील, हिम्मत पाटील, धर्मा पाटील, सुभाष पाटील, महादु पाटील, बाळु पाटील, छोटु पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश धनराज पाटील, गंजीधर पाटील, रावण पाटील, अमृत पाटील, युवराज पाटील, भाऊराव पाटील, अजय पाटील , अशोक भिल यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.