जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या समोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल पंडीत ठाकूर (वय-३८ , रा. रथचौक, कोळीपेठ जळगाव ) हा तरूण रेमंड कंपनीत नोकरीला आहे. १८ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता कंपनीत मोटारसायकल (एमएच १९ सीडी ००७३) ने कामाला गेला. मोटरसायकल कंपनीच्या समोर मोकळ्या ठिकाणी लावली होती. दुपारी ३ वाजता कामावरून सुटी झाल्याने तो घरी जाण्यासाठी मोटसायकल जवळ आला. त्याला मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. २३ मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना विकास सातदिवे करीत आहेत.