जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा रूग्णालयातील पार्किंगमधून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
विजय दत्तात्रय जगताप (वय-४५) हे . ईश्वर कॉलनीत कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शासकीय रूग्णालयात नोकरीला आहे. १८ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी विजय जगताप हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोटारसायकल (एमएच १५ सीएफ ९७०२) ने कामावर आले. महाविद्यालयातील पार्किंगमध्ये त्यांनी मोटारसायकल लावली व कामावर निघून गेले. दुपारी ते मोटारसायकल जवळ आले असता त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली पंरतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. जगताप यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २३ मे रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहेत.