नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयदेशात रस्ते सुरक्षा सुधारण्यावर अधिक जोर देत आहे. यामुळे मंत्रालयाने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांसाठी अनेक मानक सुरक्षा तरतुदींसह अनेक उपक्रम घेतले आहेत. अशाच एका पुढाकाराने आपले रस्ते अधिक सुरक्षित बनविण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मंत्रालयाने टायर उत्पादकांसाठी नवीन अनिवार्य नियम प्रस्तावित केले आहेत. जे येत्या काळात अंमलात आणले जात आहेत. त्यानंतर सर्व टायरवर रेटिंग देण्यात येईल. जे सुरक्षेनुसार असेल.अधिसूचनेत असे म्हटले आहे
या प्रस्तावित नियमांचा उद्देश वाहनांचा इंधन वापर कमी करणे आणि ब्रेकिंग सुधारणे हा आहे.प्रस्तावित केलेल्या अधिसूचनेमुळे ब्रँडची पर्वा न करता देशात विकल्या गेलेल्या टायर्सची गुणवत्ता सुधारेल. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये मानदंड प्रस्तावित आहेत.
प्रस्तावित अधिसूचनेनुसार टायरचे नवे नियम यावर्षी ऑक्टोबरपासून लागू होतील. तथापि, सर्व वर्तमान टायर मॉडेल्सना ऑक्टोबर 2022 पर्यंत कठोर कामगिरीचे निकष पूर्ण करावे लागतील.