नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून, गेल्या २४ तासांत ४,४५४ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.
देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.
राज्यात २६६७३ नव्या बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवीन २९,१७७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५१,४०,२७२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण ३,४८३९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.१२% झाले आहे.







