मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. देशातील प्रत्येक राज्य आपआपल्या परीने कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात कोणते मुख्यमंत्री सर्वात यशस्वी ठरले आहेत याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रभु चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून एक चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचा निकाल आला आहे. ट्विटरवरील या चाचणी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 62 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे सोशल नेटवर्किंग वर सध्या शिवसेना समर्थकांकडून या पोल्सचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती.’ कोणते मुख्यमंत्री करोना च्या दुसऱ्या लाटेचा सर्वात प्रभावीपणे सामना करत आहेत? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून विचारला होता. चावला यांनी दोन पोल घेतले होते. याकरिता चार पर्याय देत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते. यात पर्याय म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या पोल्सचे रिझल्ट आता पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विट केले आहेत. यात योगी आदित्यनाथ त्यांना 31. 6% मते मिळाली आहेत.पिनराई विजयन यांना 1.3 % तर उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 62.5 टक्के मते मिळाली तर अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के मते मिळाली आहेत.







