जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता ताई सोनवणे यांना आदिवासी मंत्री पद द्या, अशी मागणी आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटनेचे युवा जळगाव जिल्हा अध्यक्ष डिगंबर (सोनु) सोनवणे व शहर अध्यक्ष नरेंद्र (धर्मा) सोनवणे यांनी केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार महाराष्ट्रात ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत.
राज्यातील आदिवासी जमाती साठी येणाऱ्या योजनांसाठी आदिवासी विकास विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.मात्र या निधीतून योजना राबविताना एकाच राज्यातील आदिवासी जनतेस सावत्र भावाची वागणूक दिली जाते.जातीचा दाखला व वैधता दाखल्या पासून आदिवासींना वंचित ठेवले जाते.आदिवासींसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्या प्रत्यक्षात आदिवासी पर्यंत पोहचत नाही.त्या योजना कागदावरच पुर्ण केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष आदिवासी ना कोणताच लाभ होत नाही . गेल्या स्वातंत्र्या पासून जो गरीब आदिवासी आहे तसाच पिचलेल्या अवस्थेत आहे. हजारो वर्षांपासून सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास झालेला नाही हे उघड सत्य आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी वर होत असलेला अन्याय दुर करण्यासाठी व आदिवासींना हक्क व संरक्षण मिळण्यासाठी आदिवासी महिलेंला आदिवासी मंत्री पद दिले तर खऱ्या अर्थाने फायदा होईल व आदिवासींचा सामाजिक शैक्षणिक विकास होईल म्हणून नविन मंत्रीमंडळात आमदार लता ताई सोनवणे यांना आदिवासी मंत्री दिले तर राज्यातील संपूर्ण आदिवासी कोळी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.म्हणुन आमदार लता ताई सोनवणे यांना आदिवासी मंत्री पद द्यावे .अशी मागणी जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष,डिगंबर (सोनु) सोनवणे, शहर अध्यक्ष,नरेंद्र (धर्मा) सोनवणे,अतुल सोनवणे.जीवन सोनवणे,देविदास सोनवणे,सागर सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, गौरव तायडे (कोळी) , ललित सोनवणे याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.