औरंगाबाद (वृत्तसंस्था) – नाशिक येथे यावर्षी व्हावयाच्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
‘यक्षांची देणगी’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’, ‘प्रेषित’ अशा अनेक विज्ञानविषयक लेखनाने नारळीकर साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असून ‘चार नगरांतील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.







