यावल (प्रतिनीधी ) – नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता संदिपभैय्या सोनवणे यांच्याकडुन करण्यात आला.
साकळी – दहीगाव या जि.प.गटातील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता संदिपभैय्या प्रभाकर सोनवणे यांनी घरोघरी जाऊन शाल नारळ व पुष्पहार देऊन गावातील विकास कामे करणे व गोरगरीबा पर्यत शासनाच्या योजना पोहचविण्याकामी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनवेल येथे मा.प.स.सदस्य अरुण पाटील,थोरगव्हाण येथील भरतशेठ चौधरी , प.स.उपसभापती दिपक पाटील,नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी मंगलसिंग पाटील नरहर भिल, छगन पाटील , पंडीत सोळंके ,गोविंदा पाटील, उदयभान पाटील, गोकुळ कोळी, महेद्र पाटील उपस्थित होते.







