नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा काही केल्या संपत नाही. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी चिघळला आहे. एका सुपारी किलरने शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवले होते, अशी कथित कबुलीही त्याने दिली होती. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणाने माध्यमांसमोर केला होता, पण आता मात्र या तरुणाने आपल्या वाक्यावरून यु टर्न घेतला आहे.
शेतकरी आंदोलना दरम्यान,अत्यंत खळबळजनक असे आरोप केल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. याबाबत माहिती देताना सोनीपतचे एसपी जशनदीप सिंह रंधावा म्हणाले, या (कथिक सुपारी किलरने) मुलाने म्हटले होते की राई पोलीस स्थानकातील पोसील इंन्स्पेक्टर प्रदीप, एसएचओकडून त्याला हे काम सोपवण्यात आले होते. ज्यानंतर प्राथमिक चौकशीत ही बाब सिद्ध झाली की प्रदीप नावाचे कोणीही इन्स्पेक्टर या पोलीस स्थानकात किंवा जिल्ह्यातही नाही आहेत’.







