जळगाव ( प्रतिनिधी ) – एटीएम कार्ड हरवल्याने आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरला फोन करताना तो व्यस्त आला , मात्र नन्तर दुसऱ्याच नंबरवरून कॉल करणाऱ्याने आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत फिर्यादी तरुणीच्या खात्यातून ९० हजार लुबाडले असल्याचे आज उघडकीस आले आहे .
दिक्षा आनंदा चौधरी ( वय 26 वर्षे,व्यवसाय नोकरी, रचना कॉलनी जळगाव ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मी पुणे वेथे आय टी.कंपनीमध्ये नोकरी करते व सध्या मी घरुनच कंपनीचे काम करत असते 22 फेब्रुवारीरोजी मी रात्री ८ वाजता पांडे चौकातील
ए यु स्मॉल बँकेच्या एटीएम मधुन 2000/-रुपये काढुन घरी आल्यावर लक्षात आले की आयसीआयसीआय बँकेचे एटीएम कार्ड स्मॉल बँकेच्या एटीएम मध्येच विसरली त्याचा कोणी गैरवापर करु नये म्हणुन मी मोयाईल वरुन कार्ड ब्लॉक करणेसाठी गुगलवर कस्टमर केअर चा नंबर सर्च करून मिळवला आधी तो व्यस्त येत होता,नंतर मला कॉल आला तेव्हा रात्रीचे 11.30 वाजले होते त्याने मला एक एप्स डाऊनलोड करायला सांगीतले त्यानंतर मी त्याने विचारल्याप्रमाणे माहिती दिल्यावर माझ्या मोबाईल वर पैसे कमी झाल्याचा मेसेज आला त्याने सांगीतले की,तुमचा बॅलेन्स अपडेट होत आहे,तुम्ही फोन 12.00 वाजेपावेतो फोन सुरु ठेवा तेव्हा माझे लक्षात आले की,तो माझी फसवणुक करीत आहे.म्हणुन मी तो फोन कट केला मी बॅलेंस चेक केले माझे डेबीट कार्ड मधुन 59998/-रुपये व क्रेडीट कार्ड मधुन 30547/-रुपये कमी झाल्याचे समजले रात्र झाल्याने मी झोपुन गेली
दुसऱ्या दिवशी मी खात्री करण्यासाठी नुतन मराठा जवळील बँकेत गेली असता त्यांनी माझे अकाऊंट चेक केले कस्टमर केअरला तक्रार नोंदवुन डेबीट कार्ड व क्रेडीट कार्ड हे ब्लॉक केले.