जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा डॉ. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी दि.22 डिसेंबर रोजी जळगावातील रेडलप्स ब्लड बँकेला सदिच्छा भेट दिली. या वेळी संचालक डॉ.एम.देशपांडे यानी त्यांचे स्वागत केले. ब्लड बँकची माहिती दिली. महाराष्ट्रात रक्तसाठ्याचा तुडवडा असल्याच्या पार्श्वभूमिवर सामाजिक जाणीवेतुन ही भेट दिल्याचे त्यानी स्पष्ट केले.


या आधीही डॉ.रोहिणी खडसे खेवलकर यांच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिर झाले आहेत. डॉ. रोहिणी खडसे खेवलकर ह्या सामाजिक उपकरमांच्या सदैव पाठीशी उभ्या राहतात. याप्रसंगी डॉ. रोहिणी यांनी रेडप्लस ब्लड बँकेच्या कारभराबद्दल समाधान व्यक्त केले.
ब्लड बँकेच्या हॉस्पिटल पोच रक्तदुत सुविधेबद्दल कौतुक केले.ब्लड बँकेला रक्त साठयाच्या पुर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी डॉ मोइज देशपांडे, डॉ भरत गायकवाड, डॉ भोळे, अख्तर आली. सूरज पाटील हे उपस्थित होते.







