भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील नगरसेवकला शिवीगाळ करून त्यांच्या खिश्यातील साडेपाच हजार रूपये लांबवून पसार झालेल्या संशयित आरोपीस नाहाटा चौफुलीजवळून बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे.
प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (२९, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घटना अशी की, नगरसेवक किरण कोलते (रा.प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) यांना २३ जानेवारी रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास आरोपीने मुन्ना चौधरीने शिवीगाळ केली होती शिवाय त्यांच्या खिशातील ५ हजार ७०० रुपये हिसकावून पळ काढल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात महिन्यांपासून पसार आरोपी शहरातील नाहाटा चौफुली परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून एक हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, नाईक रमण सुरळकर, रवींद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी केली.