जळगाव (प्रतिनिधी) – आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी आज जी.एम फाउंडेशन कोविड केअर सेंटर जळगाव तेथे जावुन श्री. गणरायाची आरती केली.
जळगाव शहर व जिल्हा लवकर कोरोना मुक्त व्हावा याकरिता आमदार भोळे यांनी श्री गणेशाकडे यावेळी साकडे घातले. याप्रसंगी आमदार भोळे यांनी सर्व रुग्णांशी हितगुज केले. आमदार भोळे यांनी रुग्णांशी गप्पा मारल्या व रुग्णांचा मनोबल ऊंचविले. यावेळी कोविड सेंटरचे शिवा पाटील, मनोज जंजाळ उपस्थित होते.