यावल ( प्रतिनिधी ) – पायी जात असलेल्या भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला ऑटो रिक्षाने दिलेल्या धडकेत ती महिला गंभीर जखमी झाली यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिला माधव कोळी (वय-५४) डांभूर्णी ( ता. यावल ) येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत . भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल सायंकाळी पायी भाजीपाला विक्री करत असतांना ऑटो रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू २३७९) ने त्यांना धडक दिली. या अपघातात प्रमिला कोळी गंभीर जखमी झाल्या. त्यांना जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी महिलेच्या फिर्यादीवरून ऑटोरिक्षेवरील अज्ञात चालकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहेत.