जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तरूणीशी अश्लिल हावभाव करत हात पकडून विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात येवून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने १९ एप्रिल रोजी सायंकाळी पायी जात असतांना संशयित आरोपी अजय विनोद नाडे याने लघूशंका करत महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. मला तुझ्याशी शारिरीक संबंध ठेवायचे आहे असे सांगून तरूणीचे दोन्ही हात पकडून विनयभंग केला. तरूणी त्याचे दोन्ही हात झटकून पळत घरी गेली. शनिवारी दुपारी संशयित आरोपी अजय नाडे यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अजय नाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पो नि रोहिदास गभाले व त्यांचे सहकारी करीत आहेत .