पाचोरा ( प्रतिनिधी ) – बँकेत वारसाचे खोटे दाखले दाखवत बनावट सही व अंगठे घेवून महिलेची १२ हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
तालुक्यातील वरखेडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत संशयित आरोपी आनंद वाघ, अभिमन वाघ आणि गोविंद पाटील ( सर्व रा. लोहारी, ता. पाचोरा ) यांनी संगनमताने कल्पना शिंदे ( रा. पाळधी, ता. जामनेर) व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करत त्यांच्या वारसाच्या रक्कमेसाठी बनावट सह्या अंगठे देत बँकेतील रक्कम वर्ग करून फसवणूक केली कल्पना शिंदे यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आनंद वाघ, अभिमन वाघ आणि गोविंद पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र शिंदे करीत आहेत.