• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं – उदयनराजे भोसले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2020
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही’ अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता

पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती
माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले
आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेबांना विचारा काय झालं
व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती
संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत?
संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही

कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको

बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे, शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?

शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे, बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावं

मी का राजीनामा देऊ? जे घडलंच नाही, त्याबद्दल कशाला राजीनामा देऊ? मी माझी शपथ नीट घेतली. ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी राजीनामा द्यायला हवा

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली.

‘I Udayanraje Pratapsinhraje Bhosale.’ अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

‘तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरु झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!’ असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये’ अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे.

‘नायडू आणि भाजपने आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी’ अशी मागणी अनिल दवे यांनी केली आहे.

व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

व्यंकय्या नायडू आणि केंद्रातील भाजप सरकारचा जालन्यात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहिलेली वीस लाख पत्रे जालना जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड पत्र पाठवले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपची असलेली खोटी भावना स्पष्ट दिसली’ असे म्हणत व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने निदर्शने देण्यात आली.


 

 

Previous Post

खामखेड येथील सर्पदंश झालेल्या १५ वर्षीय बालक योग्य उपचाराने बचावला

Next Post

ते सध्या केवळ आपली प्रतिमा बनविण्यामध्ये व्यस्त आहे – राहुल गांधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ते सध्या केवळ आपली प्रतिमा बनविण्यामध्ये व्यस्त आहे - राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon