असोदा येथील ग्रामस्थ वसंत चौधरी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील असोदा येथील बहिणाबाई चौधरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाची कसून चौकशी करून त्वरित फौजदारी कारवाई करावी अशी मागणी असोदा येथील ग्रामस्थ वसंत चौधरी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. लिलावात घेतलेल्या जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वसंत चौधरी यांनी जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असोदा येथील बहिणाबाई चौधरी सहकारी पतसंस्थेकडे १० लाखापेक्षा अधिक रक्कम हि फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलेली आहे. पावत्यांची मुदत संपल्यावरही पैसे मिळण्यासाठी संबंधित पतसंस्थेकडे आणि जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी केली. मात्र ती मिळाली नाही. त्यानंतर संचालक मंडळाने थकबाकीदारांची मिळकत लिलावात काढली होती. यात वसंत चौधरी यांनी सर्वोच्च बोली लावून ममुराबाद येथील गट कर. ७२३ व शेळगाव शिवारातील गट क्र. २०४/२ हि शेतजमीन घेतलेली होती. मात्र पतसंस्थेचे संचालक मंडळ कारण नसताना मानसिक त्रास देत असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे.







