जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील भोकर शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार रुपये किंमतीचे ठिबक नळ्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय नथू सोनवणे (वय-५४) रा. भोकर, ता. जि.जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भोकर शिवारात शेत गट क्रमांक ३७६ मध्ये शेत आहे. त्या ठिकाणी त्यांनी ४५ हजार रुपये किमतीची २० हजार मीटर लांबीची ठिंबक नळ्या ठेवलेल्या होत्या. दरम्यान २२ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेले ठिंबक नळ्या चोरुन नेल्याचा प्रकार सकाळी ८ वाजता उघडकीला आला. याबाबत त्यांनी आजूबाजूच्या शेतशिवारात चौकशी केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर दत्तात्रय सोनवणे यांनी रविवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.