यावल (प्रतिनिधी) – जनतेने आपल्याला आजवर भरभरून प्रेम दिले असून याच्या ऋणातून उतराई होता येणार नसल्याचे भावपूर्ण प्रतिपादन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी काढले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ६५ व्या वाढदिवसाच्या औचीत्याने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रसंगी बोलत होते.
आ. शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरी महाराज, गादीपती सतपंथ संस्थान फैजपूर, हभप दुर्गादास नेहते महाराज खिर्डीकर,चैतन्य महाराज वृंदावनधाम पाल, यांच्यासहित माजी आ. रमेश चौधरी, शेतकी संघ चेअरमन डॉ अमोल भिरुड, रवींद्र भादले संचालक धनाजी नाना चौधरी आश्रम शाळा सत्रासेन, एस. पी. गणेशकर जिल्हा दिव्यांग समिती केंद्रप्रमुख, डॉ राजेंद्र पाटील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रावेर, प्रभाकर सोनवणे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष यावल, डॉ सुरेश पाटील, तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद शंकर वाघुळदे, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य संजय काशिनाथ चौधरी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ आर. एल. चौधरी, प्राचार्य डॉ आर. वाय. चौधरी, माजी प्राचार्य डॉ व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ राकेश चौधरी, प्राचार्य डॉ आर. बी. वाघुळदे, रियाज मेंबर, कलीम खान मण्यार खान, दारा मेंबर, केतन किरंगे, देवेंद्र साळी, राजू तडवी यांच्या सहित नगरसेवक, सरपंच, कार्यकर्ते आणि हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.