पाचोरा ( प्रतिनिधी ) – कामगार कल्याण केंद्र, पाचोरातर्फे वैशिषटयपूर्ण कार्यक्रमा अंतर्गत ईमारत व इतर बांधकाम कागारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रत्यक्ष कामगारांच्या साईटवर पुनगाव रोड येथे आयोजीत करण्यात आले होते
या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी कंस्ट्रक्शनचे सुपरवायझर शाम कुमावत उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजिनियर भूषण फासे होते हे शिबिर पाचोरा आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले शिबिरात शरीरातील तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण आदी चाचण्या करण्यात आल्या डॉ.अमित वाणी व शाहबाझ खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिरात 80 कामगारांनी तपासणी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन वाघ, केन्द्र संचालक यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती.शोभा बडगुजर व किरण पाटील यांनी नियोजन केले.