जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावातील चटई कंपनीच्या मालकाला परराज्यातील कथित पुरवठादाराने कच्चा माल पाठवण्याच्या बहाण्याने आधी फोनवर बोलत विश्वास संपादन करून २ लाखात फसवले असल्याचे उघडकीस आले आहे . यासंदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
संतोष महिपत इंगळे, ( वय- 56 वर्षे, रा- अपना घर कलनी, अयोघ्यानगर ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची शक्ती पलीमर्स नावाची चटई कंपनी आहे दि. 01/02/2022 रोजी दुपारी त्यान्ना फोन आला मोबाईल धारकाने त्याचे नाव कुंदनलाल व तो चटईसाठी लागणारे प्लस्टिक दाण्याचे मटेरियल सप्लाय करणारा व्यापारी आहे असे सांगीतले त्याने त्याच्या मालाचे नमुने मोबाईल क्रमांकावर
पाठविले मी त्यास 10 टन प्लस्टिक दाणा प्रत्येक महिन्यात लागेल असे सांगीतले. मी त्यास विविध रंगाच्या 10 टन प्लस्टिक दाणा मालाची ऑर्डर विश्वासांने दिली दि. 07/02/2022 रोजी ऑर्डरप्रमाणे माल हा पाठवुन देतो असे सांगीतले होते. तेव्हा मी त्यास माझ्या कंपनीचा पुण पत्ता, जीएसटी क्रेमांक दिला होता. ऑर्डरप्रमाणे व्यापारी कुदनलाल यांने श्री शाम एण्टरप्रायजेस, प्लट नं. 14/15, बाल विहार, जगतपुरा जलपुर, पिन कोड 302025 या कंपनीचे इन्व्हईस 108 द्वारे माझ्या कंपनीच्या नावाने 3,75,240/- रुपयाचे जी.एस.टी. बिल पाठविले पंजाब-राजस्थान रोड करीयर व्ही. 120 (र एरिक इंडस पय, चोपांकी, भिवाडी, जि. अलवार (राजस्थान) या ट्रान्सपोर्टची ब्रिल्टि पाठवली मालट्रक क्र. आर.जे. 14.जी.जी.6801. जयपूर ते जळगाव अशी ट्रान्सपोर्ट पावती पाठविली. त्यांनी मला माल भरण्याबाबत सांगीतले तसेच मालट्रक ड्रायव्हर कुमार यांचा मोबाईल्वर संपर्क केला. त्यानेही मला माल भरतीबाबत सांगीतले. त्याने मला दि. 08/02/2022 रोजी ई-वेल बिल पाठविले. मी विश्वासाने त्यांचे अंकाउन्टवर माझे जळगाव पिपल्स को-ऑप. बँक अकाऊंटवरुन एनएफटीद्वारे त्याच्या खात्यावर 2,000,00/- रुपये जमा केले होते. त्यानंतर आतापर्यंत माल पाठविलेला नाही माझी व्यापारी कुंदनलाल याने फसवणुक केलेली आहे