पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बिल्दी येथील बहुळा धरणा लगत असणाऱ्या सुमारे चार एकरमध्ये पाच कोटी रुपयांचा “कृष्णा सागर” पार्कचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आ. किशोर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.विक्रम बादल, तहसीलदार कैलास चावडे,माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, माजी जि प सदस्य मधुकर काटे, माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रशांत कुमार येळाई,सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, मार्केट कमिटीचे शिवदास पाटील, डॉ.भरत पाटील, अनिल पाटील, जयदेव पाटील, अनिल पाटील, माजी प. स.सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे आदी उपस्थित होते.
तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की, आ. किशोर पाटील यांनी के.एम. बापूंचे नाव या ठिकाणी या पर्यटन स्थळला नाव दिल्याने लोक कायम स्मरणात ठेवतील. त्यानंतर या संपूर्ण पर्यटन स्थळाचा आर्किटेक प्लॅनिंग सुजित कुमार वर्मा यांनी समजावून सांगितला. त्यामध्ये नैसर्गिक वातावरणात व संपूर्ण लेव्हल करून, पेव्हर ब्लॉक ,हॉर्टिकल्चर, लँडस्केपिंग गार्डन , पाण्याचा धबधबा,चौपाटीची व्यवस्था तेथे खाद्यपदार्थांचे दुकाने ,अत्याधुनिक स्वच्छतागृह,प्रशस्त वाहनतळ असा एकत्रित हा पूर्ण साडेतीन ते चार एकर मध्ये प्रकल्प आपण साकारणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील यांनी, पर्यटनाबरोबरच या ठिकाणी शेतीसिंचनालाही मुबलक पाणी मिळावे यासाठी परिसरातील खेड्यातील शेतकऱ्यांच्या कॅनल व पोटचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावून जेव्हा हे पर्यटन स्थळ उद्घाटन होईल तोपर्यंत मी अगोदरचा प्रलंबित असलेला उतावळी नदी बहुळा धरणाला जोडण्याचं २००७ ला के.एम .बापूंचे जे स्वप्न होतं ते मी निश्चित पूर्ण करणार असल्याचे सांगितले. मत्स्यमारींसाठी मत्स्य पूरक व्यवसाय व बोटिंग व्यवस्था कशी करता येईल याविषयी योजना आणण्याचे सांगितले .
यावेळी राजेंद्र तायडे ,नंदू सोमवंशी, किशोर बारावरकर,योगेश पाटील, बहूळाचे अभियंता नंदकुमार शेवाळे ,राम केसवानी, माजी सभापती सुभाष पाटील, चंद्रकांत धनवडे गणेश पाटील, सुभाष तावडे, शिवाजी तावडे, बिल्दी उपसरपंच निलेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे, प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील तर आभार गणेश पाटील यांनी मानले.