भडगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय आय. टी. आय. मधील कोव्हिड सेंटरमध्ये नियुक्त सेवारत कर्मचाऱ्यांतर्फे रुग्णांना मोफत फळ वाटप करण्यात आले. डॉ.पंकज जाधव यांचेसह नियुक्त कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह उपस्थितांच्या हस्ते सफरचंद वाटप करण्यात आले.

यावेळी भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. पंकज जाधव, डॉ. पुनम सांगवीकर,भातखंङे विदयालयाचे उपशिक्षक सुनिल भोसले, संदिप पाटील, आंचळगाव विदयालयाचे सेवक कर्मचारी सुभाष जाधव, विजय पाटील, पिंपरखेड विदयालयाचे सेवक कर्मचारी, युवराज पाटील, पोलीस कर्मचारी भाऊराव पाटील, होमगार्ड राहुल पाटील, पत्रकार अशोक परदेशी गोंडगाव, आरोग्य कर्मचारी किरण राठोङ, भैय्या महाजन,आदि आरोग्य कर्मचार्यांसह नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
कोव्हिङ सेंटरवर नियुक्त कर्मचार्यांनी स्वखर्चातुन रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आले.







