धरणगाव( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून शेतकऱ्याची ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र शंकर कोळी ( वय – ६५) रा. शिव कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहायला असून त्यांची मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ७३७५) आणि ट्रॉली (एमएच १९ एएन ९७१८) हे पाळधी शिवारातील हायवे जवळील नोवेल सीड प्रायव्हेट लिमिटेड गोडाऊनच्या समोर असलेल्या जागेत पार्किंगला लावले होते. ट्रॅक्टसह ट्रॉलीची अज्ञात चोरट्यांनी चोर केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात रामचंद्र शंकर कोळी यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे.