जळगाव – शिरसोली दरम्यान अपघात
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली कडून जळगावकडे येणारी दुचाकी (क्र. एम.एच.19 डी.जी. 1514) ने जळगाव कडून शिरसोली कडे जाणाऱ्या दुचाकी (क्र. एम.एच.19 सी.एम 4845) वरील चालक अनिल बुधा पाटील (वय 35) रा. सामनेर ता. पाचोरा याला आज सायंकाळी ६. ४५ दरम्यान जोरदार धडक दिली. यात अनिल पाटील हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अनिल पाटील हे जळगावातील डाबी हाँस्पिटल मध्ये वार्ड बाँयचे काम करत आहे. गुरुवारी दि. २२ रोजी कामावरुन सुट्टी झाल्यावर सामनेरगावी घराकडे परत जात असतांना शिरसोली जकात नाक्याजवळ हा अपघात झाला. यात अनिल पाटील हे रस्त्यावर जोरात फेकले गेले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत अनिल पाटील याला जळगावातील साई अँक्सीडेन्ट हॉस्पिटल दाखल केले आहे. यात अनिल पाटील याला हात व पायावरील गंभीर दुखापत झाली असल्याचे कळते. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्थानकात ८ वाजेपर्यंत घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली.