मुंबई (वृत्तसंस्था) – ओएनजीसीच्या एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदार कंपनीने केलेल्या हव्यासापोटी सुमारे 80 जणांचे जीव धोक्यात घालण्यात आले पैकी 25 जणांचे मृत्यू झाला तर उर्वरित अद्याप बेपत्ता आहेत. हे या कंत्राटदार कंपनीचे बेपर्वाईचे बळी असल्याने या कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची चौकशी भकटवून, पिढीतांना न्यायापासून लटकवण्याचे काम राज्य शासनातील झारितील शुक्राचार्य कोण? असा गर्भित सवाल ही भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे समुद्रात बार्ज दुर्घटना प्रकरणी आज अखिल भारतीय नाविक संघाच्या शिष्टमंडळाने
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतल्या नंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
सदर दुर्घटनेप्रकरणी बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ही बाब वस्तुस्थितीला धरुन आहे असे वाटत नाही. या दुर्घटनेला केवळ कॅप्टनालाच कसे जबाबदार धरता येईल? बार्जचे कंत्राटदार कंपनी या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. मात्र कंपनी यातून पळ काढू पाहत असल्याने त्या कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे सांगत आमदार. अँड आशिष शेलार यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवर पोलीसांचे लक्ष वेधले आहे.