जळगाव (प्रतिनिधी) – येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांची सोमवारी अकोला येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. विठ्ठल तुकाराम भुकन हे सातारा येथून जळगावला अधीक्षक म्हणून येत आहे. सोमवारी २२ मे रोजी राज्याच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्काच्या पाच अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
सदर अधिकाऱ्यांना तत्काळ पदावर रुजू होण्यास सांगितले आहे. अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने गृह विभागाने आदेश काढले आहे. यात सीमा झावरे यांची जळगाव येथून अकोला येथे तर गणेश दशरथ पाटील यांची अहमदनगर येथून परभणी येथे, कीर्ती शेंडगे यांची रायगड येथून सातारा येथे तर प्रमोद सोनोने यांची भंडारा येथून अहमदनगर येथे तसेच डॉ. विठल भुकन यांची सातारा येथून जळगाव येथे बदली झाली आहे.