जामनेर (प्रतिनीधी) – शहरातील गिरीजा कॉलनीतील बांधकाम ठेकेदार भगवान रामदास खोडपे यांचे मोठे चिरंजीव अंकुश भगवान खोडपे याचा पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी अंत झाला.
अंकुश खोडपे पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी बहिणीसोबत राहत होता दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास अंकुश खोडपे याला तीव्र स्वरूपाचा हृदय विकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली स्पर्धा परीक्षेचा सराव करून भविष्यात जिल्हाधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळाले अंकुश खोडपे हा मनमिळावू स्वभावाचा एक हुशार विद्यार्थी होता अंकुश च्या जाण्याने खोडपे परिवारावर फार मोठे दुःख कोसळले आहे अंकुश च्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!