पारोळा ( प्रतिनिधी ) – विषारी औषध सेवनाने मृत्यू झाल्याच्या घटनेचा गुन्हा धुळ्यातून पारोळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे .
पारोळा तालुक्यातील जिराळी येथील रहिवाशी नाना भिल ( सोनवणे ) यांनी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता विषारी औषध सेवन केल्याचे उघडकीस आले होते . त्यांना कुटुंबीयांनी आधी बहाद्दरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र , त्यांनतर पारोळा कुटीर रुग्णालय आणि नन्तर धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असताना १७ फेब्रुवारीरोजी त्यांचा मृत्यू झाला होता . या रुग्णालयाने धुळे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद धुळे पोलिसांनी केली होती . आता हा गुन्हा पुढील तपासासाठी पारोळा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे .