गांधीनगर (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृढ आणि प्रभावी नेतृत्वाने संपूर्ण जगाला, भारताकडे एका नव्या नजरेतून पाहण्याची दृष्टी दिली आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि दृढ विश्वासाने संपूर्ण देशालाच पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे. मला विश्वास आहे, की त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या ‘धाडसी सुधारणा’ पासूनच आगामी काळात भारताची केवळ वेगाने आर्थिक भरपाईच नाही, तर आर्थिक प्रगतीचा मार्गही प्रशस्त होईल, अशा शब्दांत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शनिवारी (दि. 21) मोदींची प्रशंसा केली.

पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभास व्हर्च्युअली संबोधित करत होते. अंबानी म्हणाले की, आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की पीडीपीयू हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर दृष्टीचेच एक प्रॉडक्ट आहे. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी यासंदर्भात दृष्टिकोन दिला होता. ते म्हणाले, पीडीपीयू केवळ 14 वर्षांपूर्वीचेच असले तरी ते नवकल्पनांसाठी अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये टॉप-25 मध्ये आहे. अंबानी म्हणाले यांनी यावेळी ऊर्जा, हवामान बदलावरही भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पीडीपीयूच्या या आठव्या दीक्षान्त समारंभात व्हर्च्युअली संवाद साधला.







