जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या नावाने बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेट देणारा दुसरा फरार आरोपी आज पोलिसांनी पकडला आहे .
जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 6 फेब्रुवारीरोजी डॉ .विजय गायकवाड (वैदकीय अधीक्षक शासकीय महाविद्यालय ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे ( रा.जळके विटनेर ) , स्वप्नील पांडुरंग पाटील ( रा.धानवड ) यांनी मिळून रुग्णांची कोरोना चाचणीकरीता आवश्यक असणारे स्वैब न घेता कुठल्याही प्रकारची कोविड 19 ची चाचणी न करता बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल देऊन बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून त्याचा खरा म्हणून वापर करून शासनाची फसवणूक केली अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आरोपी स्वप्नील पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता, त्याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास अटक करून न्या विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात हजर केले त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी दिली आहे.पो नि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश देशमुख पुढील तपास करीत आहेत.