जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात आज एक कारोनाबाधित रूग्ण आढळला आहे. तर ७ कोरोनाबाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
आजच्या अहवालात यावल शहरातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. कोरोना बाधितांपैकी आजपर्यंत २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ६२ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.