मुंबई (वृत्तसंस्था)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे टीकेची धनी ठरली आहे.
कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यावरून अनेकांनी कंगनाला सुनावलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे.
अशातच आता यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘मी कोणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच फार सुरक्षित वाटतं. येथे मी खुलेपणाने माझं मत मांडू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पाहून शिवसेनेप्रती माझी प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं’
दरम्यान, सध्या पाहायला गेलं तर सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्या