शिरसोली ( प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत शिरसोली प्र. न. मार्फत सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना एक पगार व मिठाईचे पॉकेट असे गोड दिवाळी बोनस देण्यात आला.
गावातील समाजसेवकांच्या समोर यावेळी सरपंच हिलाल भिल, श्रावण ताडे, द्वारकाबाई बोबडे, शशिकांत अस्वार,प्रणय सोनवणे, रामकृष्ण काटोले, मुद्स्सर पिंजारी, भगवान बोबडे, मिठाराम पाटील, माजी सरपंच शेणफडू पाटील, बारी समाज चेअरमन सुभाष बारी, वासुदादा बोरसे, नाना हवालदार,उत्तम अस्वार, निलेश बोरसे, देवराम नागपुरे, ग्राम विकास अधिकारी, समाधान बोबडे, रोप पिंजारी उपस्थित होते.