नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही आतिशय महत्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या सर्व्हिससंबंधी सूचनेचे ट्विट करून माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मेंटनन्स अॅक्टिव्हिटीमुळे बँकेच्या काही सेवा 21 मेपासून 23 मेपर्यंत यावेळी बंद राहतील. एसबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहकांना विना अडथळा बँकिंग अनुभव देण्यासाठी सर्व्हिस चांगली करण्यासाठी मेंटनन्स वर्क केले जात आहे.
भारतीय स्टेट बँकेने यासंबंधी महत्वाच्या सूचनेअंतर्गत ट्विट करून माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की, 21 मे रोजी 10:45 पीएम ते 22 मे रोजी रात्री 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत आणि 23 मे 2021 ला 02.40 एएम ते 06.10 एएम च्या दरम्यान बँक मेंटनन्सचे काम करेल. या दरम्यान एसबीआय कस्टमर्स INB/YONO/YONO Lite/UPI सर्व्हिसेसचा वापर करू शकणार नाहीत.
31 मे पूर्वी करावे लागेल केवायसी अपडेट
एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना केवायसी अपडेट 31 मे पर्यंत वाढवून दिलासा दिला आहे. बँकेचे म्हणणे आहे की, ग्राहकांना केवायसीसाठी बँकेत येण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आता पोस्ट किंवा ई-मेलने केवायसी डॉक्युमेंट जमा करू शकतात.